Maharashtra

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची एकजूट

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची एकजूट
बारामती बैठकीत अजित पवार–शरद पवार गटांचा संयुक्त लढतीचा निर्णय
बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शरद पवार गट एकत्र लढणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बारामती येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान जाहीर केले आहे.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पुणे, सोलापूरसह बहुतांश जिल्ह्यांत संयुक्त उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. काही ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढत ठेवण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकांत भाजप–शिवसेनेने पुण्यासह अनेक शहरांत वर्चस्व मिळवले. त्यामुळे ग्रामीण भागातील सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र येणे अपरिहार्य ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादीची ही एकजूट भाजप–शिवसेनेसाठी आव्हान ठरणार की अंतर्गत विसंवाद डोके वर काढणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button