Maharashtra

हिंजवडीतील यश वन सोसायटीत ‘सहकार दरबार’

हिंजवडीतील यश वन सोसायटीत ‘सहकार दरबार’
गृहनिर्माण सोसायटींच्या कायदेशीर बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

हिंजवडी (पुणे) | शनिवार, १० जानेवारी २०२६
हिंजवडी येथील यश वन सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ यांच्या वतीने ‘सहकार दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गृहनिर्माण सोसायटींच्या दैनंदिन कारभाराशी संबंधित कायदेशीर, आर्थिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी चारुहास कुलकर्णी
(पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ – खजिनदार)
आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कणाद लहाने
(पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ – सदस्य)
यांनी उपस्थित सोसायटी पदाधिकारी व सभासदांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास सहकार मित्र अभिजित कुलकर्णी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ऑक्युपेशन सर्टिफिकेट (OC) न घेतल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या दीर्घकालीन कायदेशीर अडचणी, तसेच कन्व्हेयन्स डीड (Conveyance Deed) संदर्भातील महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट करण्यात आल्या. यासोबतच कलम १३ व कलम १७ अंतर्गत सोसायटींचे अधिकार व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात RERA कायदा, पुणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायटींची कार्यपद्धती, तसेच सामान्य सभेचे (General Body) अधिकार यावर सखोल चर्चा झाली.
तसेच ई-मीटिंग, व्हर्च्युअल मीटिंग व ई-व्होटिंग बंद करण्यामागील कारणे, सोसायटीची बजेट प्रक्रिया, तसेच मंजूर बजेटपेक्षा किती अतिरिक्त खर्चास परवानगी आहे, याबाबतही स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सोसायटी कमिटीचे पदाधिकारी
अभिजित गुरव (D बिल्डिंग – सेक्रेटरी),
प्रशांत भोपळे (E बिल्डिंग – सेक्रेटरी) व
संदीप पाटील (फेडरेशन – खजिनदार) उपस्थित होते.
हा सहकार दरबार सोसायटीचे पदाधिकारी व सभासदांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
मो. : ९८२२५४८४२९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button