Maharashtra

हिंदू महासभेकडून पुण्यात विविध प्रभागांत उमेदवार जाहीर; ‘नगारा’ चिन्हावर अधिकृत व ‘नारळ’ चिन्हावर पुरस्कृत उमेदवार निवडणूक मैदानात

हिंदू महासभेकडून पुण्यात विविध प्रभागांत उमेदवार जाहीर; ‘नगारा’ चिन्हावर अधिकृत व ‘नारळ’ चिन्हावर पुरस्कृत उमेदवार निवडणूक मैदानात

पुणे | प्रतिनिधी
आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभेने पुणे शहरातील विविध प्रभागांमधून आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. हिंदू महासभेचे अधिकृत उमेदवार “नगारा” या निवडणूक चिन्हावर, तर पुरस्कृत उमेदवार “नारळ” या चिन्हावर निवडणूक मैदानात उतरले असून, पक्षाने महापालिका निवडणुकीत ठाम व आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अधिकृत उमेदवार (नगारा चिन्हावर):
प्रभाग २५ (क) – सौ. तृप्ती मनोज तारे (शनिवार पेठ, मंडई)
प्रभाग २५ (ड) – अजित जोशी (शनिवार पेठ, मंडई)
प्रभाग २६ (ड) – सूर्यकांत कुंभार
प्रभाग ३४ (ड) – नितीन दामोदर शुक्ल (वडगाव बुद्रुक, धायरी, नऱ्हे)
प्रभाग ३७ (ड) – राजेंद्र देशपांडे (कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी)
प्रभाग २२ – राजेश सिद्धराम जन्नु (काशेवाडी, डायस प्लॉट)
पुरस्कृत उमेदवार (नारळ चिन्हावर):
प्रभाग २४ – उज्वलाताई जितेंद्र गौड (कसबा पेठ, कमला नेहरू हॉस्पिटल परिसर)
“आम्ही आलोय!” या ठाम घोषणेसह हिंदू महासभा जनसामान्यांसाठी प्रामाणिक, संघर्षशील आणि विकासाभिमुख पर्याय घेऊन निवडणूक मैदानात उतरली आहे. सर्व उमेदवार हे सामाजिक, नागरी आणि जनहिताच्या कामात सक्रिय असून, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक व पार्किंग समस्या, पारदर्शक प्रशासन तसेच सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
उमेदवारांची घोषणा होताच संबंधित प्रभागांमध्ये कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
📞 ९८२२५४८४२९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button