गुड चाईल्ड प्री-प्रायमरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
गुड चाईल्ड प्री-प्रायमरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
सांगवी (पुणे) :२०/०१/२०२६


गुड चाईल्ड प्री-प्रायमरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा निळू फुले सभागृह, सांगवी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पालक, शिक्षकवर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंद दवे, तसेच श्री. दिलीप गायकवाड, श्री. सचिन जगताप उपस्थित होते. तसेच शाळेचे संस्थापक खिलारे सर, फर्नांडिस सर, फर्नांडिस मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, अभिनय व समूह सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या निरागस सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
यावेळी डॉ. आरती कुलकर्णी यांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी हिंदू महासभेच्या CA आदिती जोशी, स्मिता कुर्वे मॅडम तसेच उमेश कुलकर्णी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. शिक्षणासोबत संस्कार, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य,शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांचे आभार मानून करण्यात आली.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
📞 ९८२२५४८४२९
