Maharashtra
एनसीपी (अजित पवार गट)च्या विजयासाठी दिनकर मिश्रांची पूर्ण ताकद

एनसीपी (अजित पवार गट)च्या विजयासाठी दिनकर मिश्रांची पूर्ण ताकद

सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनसीपी (अजित पवार गट)चे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय प्रमुख दिनकर मिश्रा यांनी पक्षाच्या विजयासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. ते सातत्याने विविध ठिकाणी उत्तर भारतीय समाजबांधवांसोबत बैठका घेत असून, अनेक प्रभागांमध्ये जोरदार निवडणूक प्रचार करत आहेत.
प्रभाग क्रमांक १६, २, ९, २७ व २८ या सर्व प्रभागांमध्ये उत्तर भारतीय जनता सभा आयोजित करण्यात येत असून, घराघरांत जाऊन प्रत्यक्ष प्रचार सुरू आहे. या माध्यमातून पक्षाच्या धोरणांचा प्रसार करत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. उत्तर भारतीय समाजाकडून या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
