डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न.


चिंचवड :डेलमाँट इंग्लिश मीडियम स्कूल, सांगवी यांचा वार्षिक स्नेहसंमेलन आज दि. १९ जानेवारी रोजी रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंद दवे (हिंदू महासभा कार्याध्यक्ष) तसेच रेखाताई आखाडे (President, Lions Club of Galaxy Pune) उपस्थित होत्या. यावेळी शाळेचे संस्थेचे संस्थापक शहाजी खिलारे, डायरेक्टर संतोष जाधव सर, रुपाली जाधव मॅडम, तसेच महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या कुलकर्णी मॅडम, शाळेचे पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन व गणेश वंदनेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, नाट्य, गीत व समूह सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
यावेळी मागील शैक्षणिक वर्षात वर्गात प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून शिक्षणासोबत संस्कार व कौशल्य विकासाला शाळा नेहमीच प्राधान्य देते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य प्रीती शेट्टी मॅडम, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता उपस्थितांचे आभार प्रदर्शन व ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आली.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
9822548429

