चिंचवड प्रभाग १८ मध्ये भाजपचा प्रचार शिगेला; मधुकर बच्चे यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांत उत्साह
चिंचवड प्रभाग १८ मध्ये भाजपचा प्रचार शिगेला;

मधूकर बच्चे यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांत उत्साह
चिंचवड
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड प्रभाग क्रमांक १८ मध्ये प्रचाराला वेग आला असून भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे संघटन कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रामाणिक कार्यकर्ते मधुकर बच्चे सक्रियपणे प्रचार रिंगणात उतरले आहेत.
मधुकर बच्चे यांच्या सहभागामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, जोश आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद, बूथ पातळीवर संघटन मजबूत करणे आणि भाजपच्या विकासकामांची माहिती देण्याचे काम ते प्रभावीपणे करत आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते अधिक संघटित झाले असून प्रचार यंत्रणेला नवी धार मिळाली आहे. त्यामुळे प्रभाग १८ मध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास वाढला असून “चिंचवडमध्ये कमळ फुलणारच” असा ठाम विश्वास भाजपकडून व्यक्त केला आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

