भोसरी प्रभाग क्र. ५ मध्ये दिलीप सावंत ‘मामा’ यांची निष्ठेची मशाल घरोघरी
भोसरी प्रभाग क्र. ५ मध्ये दिलीप सावंत ‘मामा’ यांची निष्ठेची मशाल घरोघरी

गेली तब्बल ४० वर्षे शिवसेनेशी अखंड निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर भोसरी प्रभाग क्र. ५ मध्ये दिलीप सावंत ऊर्फ ‘मामा’ घरोघरी पोहोचत आहेत. राजकारणापेक्षा समाजसेवा हा केंद्रबिंदू ठेवून काम करणाऱ्या मामांनी नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
YCM रुग्णालयात गेली ४० वर्षे कोणताही मोबदला न घेता शहरातील गरजू व रुग्णांना मदतीचा हात देत आलेल्या दिलीप सावंत यांना नागरिक प्रेमाने ‘मामा’ या नावाने ओळखतात. निस्वार्थ सेवाभावामुळे मामांचा चेहरा हा आज प्रभागात आश्वासक, विश्वासार्ह आणि एका फोनवर काम करून देणारा माणूस म्हणून ओळखला जात आहे.
या निवडणुकीत समोरील उमेदवार ताकद, यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर प्रचार करत असताना, मामा मात्र अत्यंत साध्या, पारंपरिक आणि लोकांशी थेट संवाद साधणाऱ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. याच साधेपणाची आणि प्रामाणिकतेची नागरिकांमध्ये विशेष चर्चा असून, अनेक मतदारांना या पद्धतीचा हेवाच वाटत असल्याचे चित्र आहे.
गाडीभेटी, घराघरातील भेटी आणि थेट संवादातून मामांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते सोबत असतानाही, तेच कार्यकर्ते ताकदीने, जोमाने आणि निष्ठेने प्रचार करताना दिसत आहेत.
दिलीप सावंत मामा स्वतः प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन “मशाल पेटवण्याचे” आवाहन करत असून, प्रभागात त्यांना संधी देण्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
निष्ठा, सेवा आणि विश्वास याच्या जोरावर ही संधी मामांच्या पारड्यात टाकण्याचा सूर मतदारांमध्ये उमटू लागला आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ