स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*

*स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
पारध दिनांक: 06/12/2025(श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी)
पारध शाहूराजे तालुका भोकरदन येथील स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. संतोष सोनुने सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी वंशिका तेलंग्रे आणि श्रद्धा लक्कस यांनी गीताद्वारे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे देत त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्कस सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेऊन आपणही ज्ञानसंपन्न बनावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीचा विद्यार्थी प्रणव काटोले यांनी उत्तमरित्या केले. तसेच शाळेचे सहशिक्षक श्री. संतोष सोनुने सर, सोनवणे सर, श्री. पाखरे सर, श्री. लोखंडे सर तसेच सहशिक्षिका श्रीमती लोखंडे मॅडम, झोरे मॅडम, राऊत मॅडम, भारती मॅडम आणि नरोटे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना भाषणाद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप श्री. सूर्यकांत गालफाडे सर यांच्या मनोगतांनी झाला.


