Maharashtra

सत्काराला फाटा देऊन नगरसेवकांनी दंड थोपटले नेवासा शहरात कृत्रिम पाणी टंचाईचा आरोप; तीन दिवसांत सुधारणा न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा.

 

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा शहरात पाणीपुरवठ्याची कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था न करता नगरपंचायत प्रशासनाने दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या पाडल्याने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे नेते संजय सुखदान यांनी केला आहे. या मुद्द्यावर नव-निर्वाचित नगरसेवकांसह त्यांनी सत्काराला फाटा देत नगरपंचायत प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

निवडणुकीदरम्यान शहराला नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र २०२३ पासून पाणी साठवणुकीसाठी पर्यायी व्यवस्था न करता टाक्या पाडण्यात आल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

नगरपंचायत कार्यालयावर नगरसेवकांनी दंड थोपटत पाणी प्रश्नावर जाब विचारला. प्रशासनाने तातडीने सुधारणा करून तीन दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा नगरसेवक व शहरवासी एकत्र येऊन तीव्र जनआंदोलन छेडतील, असा इशाराही संजय सुखदान यांनी दिला.

या आंदोलनात जयश्री शिंदे, जितेंद्र कुचे, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, शहिदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसीम मुकादम शेख, शोभा व्यवहारे, प्रतिभा गवळी यांच्यासह अनेक नगरसेवक व नागरिक उपस्थित होते

प्रतिनिधी: श्याम शिरसाठ नेवासा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button