पुणे महानगरपालिका प्रभाग ३१ मधून शिवसेना (UBT) कडून प्रज्ञा लोणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे महानगरपालिका प्रभाग ३१ मधून शिवसेना (UBT) कडून प्रज्ञा लोणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे, दि. १३ डिसेंबर २०२५:
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी प्रभाग क्रमांक ३१ (सर्वसाधारण महिला) प्रवर्गातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सामाजिक कामाच्या जोरावर ओळख निर्माण केलेल्या सौ. प्रज्ञा कौस्तुभ लोणकर यांनी आज इच्छुक उमेदवार म्हणून आपला अधिकृत विनंती अर्ज शिवसेना भवन, पुणे येथे सादर केला.
यावेळी बोलताना सौ. लोणकर म्हणाल्या, “नागरिक बंधू-भगिनींच्या आशीर्वाद, विश्वास आणि ठाम पाठिंब्याच्या बळावर मला उमेदवारी निश्चितच मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.” प्रभागात केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा अनुभव तसेच प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहर प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू असून उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे



