पुणे : “बाबरी नंतरचा हिंदू” विषयावर अखिल भारतीय हिंदू महासभेचे जाहीर आख्यान

पुणे : “बाबरी नंतरचा हिंदू” विषयावर अखिल भारतीय हिंदू महासभेचे जाहीर आख्यान
पुणे : अखिल भारतीय हिंदू महासभातर्फे “बाबरी नंतरचा हिंदू” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन येत्या शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता, सिंहगड रोडवरील सिद्धार्थ हॉल येथे पार पडणार आहे.
या व्याख्यानातून बाबरी प्रकरणानंतर हिंदू समाजासमोर निर्माण झालेल्या सामाजिक व धार्मिक बदलांचा ऊहापोह करण्यात येणार आहे. हिंदू समाजाची वर्तमान परिस्थिती, आगामी दिशा आणि संघटनात्मक बळकटी या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आनंद दवे असून ते विविध पैलूंवर आपले विचार मांडणार आहेत. अखिल भारतीय हिंदू महासभा, पुणे विभाग तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

