Uncategorized

प्रभाग ५ मध्ये सौ. नीलमताई कुंडलिक लांडगे यांची प्रचारात आघाडी

प्रभाग ५ मध्ये सौ. नीलमताई कुंडलिक लांडगे यांची प्रचारात आघाडी


प्रभाग क्रमांक ५ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला इच्छुक उमेदवार सौ. नीलमताई कुंडलिक लांडगे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. घरोघरी संपर्क, नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका यामुळे त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मागील निवडणुकीत कुंडलिक लांडगे हे इच्छुक उमेदवार होते. मात्र ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने त्यांनी संयम राखत माघार घेतली. त्यानंतर कोणताही नाराजीचा सूर न लावता त्यांनी भाजप आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य सुरूच ठेवले. इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी नागरिकांच्या विविध कामांचा पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले.
सातत्याने प्रभागात सक्रिय राहिल्याने कुंडलिक लांडगे यांची ओळख विश्वासार्ह सामाजिक कार्यकर्ता म्हणून निर्माण आहे. यावेळी प्रभाग महिला आरक्षित असल्याने त्यांनी आपल्या पत्नी सौ. नीलमताई कुंडलिक लांडगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सौ. मीनलताई लांडगे या महिला व बालकल्याण, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत नागरी सुविधांवर भर देत प्रचार करत आहेत. त्यांच्या साध्या, थेट आणि कामावर आधारित भूमिकेमुळे महिला मतदारांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रभाग ५ मध्ये त्यांचा प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button