प्रभाग क्रमांक ३० मधून सौ. मधुरा सुनील भोईर यांची सर्वसमावेशक विकास अजेंड्यासह उमेदवारी

चिंचवड महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्रमांक ३० मधून सौ. मधुरा सुनील भोईर यांची सर्वसमावेशक विकास अजेंड्यासह उमेदवारी
चिंचवड | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
चिंचवड–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रभाग क्रमांक ३० (दापोडी–फुगेवाडी–कासारवाडी) येथून अनुसूचित जमाती (ST) महिला राखीव प्रवर्गातून सौ. मधुरा सुनील भोईर यांनी ‘नागरिक सेवक’ म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
महादेव कोळी (अनुसूचित जमाती) समाजातील सौ. मधुरा भोईर या सामाजिक जाण असलेल्या, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या उमेदवार असून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व प्रभागाचा कायापालट हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
समाजहित व आदिवासी अस्मितेवर भर
आदिवासी अस्मिता जतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित सामाजिक समता, संस्कृती जपणारे उपक्रम आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी योजनांचा लाभ थेट घरापर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या अजेंड्यातील प्रमुख मुद्दे आहेत.
प्रभागात नियमित कचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्था बळकट करणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व हायमास्ट दिवे बसवून सुरक्षितता वाढवणे, तसेच सुसज्ज आरोग्य केंद्रे आणि महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘AI Learning Hub’, मोफत कोडिंग सेंटर, हाय-स्पीड इंटरनेटसह स्मार्ट डिजिटल लायब्ररीची स्थापना, शाळांच्या दर्जात सुधारणा, अभ्यासिका व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, बचत गटांना चालना, आर्थिक स्वावलंबनासाठी विशेष योजना राबवण्याचा संकल्प सौ. भोईर यांनी व्यक्त केला आहे.
प्रभागातील मुला-मुलींसाठी आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मल्टीपर्पज ग्राउंड, ओपन जिम व व्यायामाची साधने उपलब्ध करून देणे, युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, ‘स्किल डेव्हलपमेंट’ सेंटर, रोजगार मेळावे आणि स्थानिक उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
स्थानिक पातळीवर क्रिकेट, कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग, कुस्ती यांसारख्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याचाही संकल्प त्यांनी मांडला.
पर्यावरण संरक्षण
फुगेवाडी–दापोडी परिसरातील पवन व मुळा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, नदीकाठ संवर्धन, वृक्षारोपण, ‘शून्य कचरा (Zero Waste)’ मोहिम राबवून सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंडीमुक्त प्रभाग निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“एक संधी… विकासासाठी, विश्वासासाठी!” या घोषवाक्याखाली सौ. मधुरा सुनील भोईर यांनी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व नागरी सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांचा आशीर्वाद व पाठिंबा मागितला आहे.
आपण सर्वांनी मिळून प्रभाग क्रमांक ३० चा सर्वांगीण विकास घडवूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


