पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण.

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी–कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
हे प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात पार पडले. प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणी, मतदार ओळख प्रक्रिया, आचारसंहिता तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना निष्पक्ष, शांततापूर्ण व नियमबद्ध मतदान पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले. मोठ्या संख्येने मतदान अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी
📅 मतदानाची तारीख : १५ जानेवारी २०२६
निश्चित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला प्रशासनाने वेग दिला आहे.या प्रशिक्षणामुळे निवडणूक यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रतिनिधी : श्याम शिरसाठ पुणे, पिंपरी चिंचवड