पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनकडून निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय
पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनकडून निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय
पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने सोसायटीधारकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आगामी निवडणुकांत स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी फेडरेशनचा उमेदवार नसेल, त्या ठिकाणी पक्षीय विचार न करता सक्षम व विश्वासार्ह उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली.
सोसायट्यांमधील देखभाल, सुरक्षितता, पार्किंग तसेच आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे फेडरेशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी सोसायटीधारकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेत योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
संजीवन सांगळे म्हणाले, “सोसायटीधारकांच्या हितासाठी आम्ही ठामपणे उभे राहू. फेडरेशनचा उमेदवार नसेल, तरीही चांगल्या आणि सक्षम व्यक्तीला आम्ही पाठिंबा देऊ.”
पिंपरी-चिंचवडमधील अनेक सोसायट्यांमध्ये गेल्या काही वर्षांत देखभाल खर्च, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेसंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. सोसायटीधारकांचे प्रतिनिधित्व करणारे फेडरेशन स्थानिक पातळीवर ठोस बदल घडवण्यासाठी सक्रिय असून, निवडणुकांच्या माध्यमातून या प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

