पारध (शाहूराजा) येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी*

*पारध (शाहूराजा) येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी*
पारध (शाहूराजा) दि.08/12/2025 (श्री महेंद्र बेराड सर भोकरदन तालुका प्रतिनिधी) येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली.
येथील श्री पराशर ऋषी महाराज मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र चैतन्य स्वामी सावंगीकर (अ.) यांनी संत संताजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी आध्यात्मिक प्रवचन दिले.
कार्यक्रमाची सुरुवात संताजी महाराज यांच्या पूजनाने झाली. यानंतर आरती व भंडाऱ्याचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी सभापती श्री.परमेश्वर पा. लोखंडे, उपसरपंच श्री. शेखरभैया श्रीवास्तव, श्री. समाधान लोखंडे गुरुजी, माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर पाटील लोखंडे, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संजय लोखंडे, महेंद्र लोखंडे, संजय कतोरे, सुरेश अल्हाट, सुरेश देशमुख, रविंद्र लोखंडे सर, उदयसिंह लोखंडे,महेंद्र बेराड सर, तेजराव दांडगे, कृष्णा लोखंडे तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी संतोष पाखरे, राजू पाखरे, जनार्धन पाखरे, गणेश पाखरे, गजानन पाखरे, सतिश पाखरे, सुनिल पाखरे, अमोल पाखरे, विठ्ठल राऊत, गजानन सोनुने आणि संपूर्ण पाखरे परिवार यांनी परिश्रम घेतले.


