Maharashtra
मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर
नागपूर: शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार – २०२५ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराने फडणवीस यांच्या महाराष्ट्र विकासातील अमूल्य योगदानाला सन्मानित करण्यात येत आहे.मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय, धडाडीचे कार्य आणि पारदर्शक कारभार यामुळे त्यांच्या नेतृत्वाला नव्याने झळाळी मिळाली आहे. संस्थेच्या या निर्णयाचे स्वागत होत असून, फडणवीस यांना मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
