Maharashtra
मिरा-भायंदर : कस्तुरी हाइट्स इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

मिरा-भायंदर : कस्तुरी हाइट्स इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई
मिरा-भायंदर पूर्वेकडील इंद्रलोक फेज ६ मधील कस्तुरी हाइट्स इमारतीत आज दुपारी भीषण आग लागून परिसरात घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत वेगाने कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीच्या धुरामुळे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी माजी महापौर डिंपल मेहता, तसेच शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नेते पोहोचले असून मदतकार्य आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.
प्रतिक्रिया;सिंथिया कोरिया मुंबई

