महापालिका निवडणूक: प्रभाग २५ (ड) मधून मयुरेश अरगडे यांचा शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज

महापालिका निवडणूक: प्रभाग २५ (ड) मधून मयुरेश अरगडे यांचा शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज
पुणे| प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (ड) मधून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त करत मयुरेश पद्मा प्रकाश अरगडे यांनी शिवसेना पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज सादर केला आहे.
मयुरेश अरगडे हे महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेश अध्यक्ष असून ते शिवसेनेचे सक्रिय सदस्य आहेत. शिवसेनेची ध्येय-धोरणे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांप्रती असलेली तळमळ यामुळेच आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाने संधी दिल्यास, निवडणूक केवळ लढवण्यापुरती मर्यादित न ठेवता पूर्ण तयारीनिशी विजय मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरी सुविधा आणि विकासकामे या मुद्द्यांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा निर्धार अरगडे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेत इच्छुक उमेदवारांसाठी असलेली अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल महानगर मंत्री रवींद्र भाऊ धंगेकर, शहरप्रमुख प्रमोदनाना भानगीरे आणि शहर सचिव संदीपजी शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
