मथूरा भोईर यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभाग ३० मध्ये प्रचार शिगेला
मथूरा भोईर यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभाग ३० मध्ये प्रचार शिगेला

चिंचवड | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी प्रभाग क्रमांक ३० (दापोडी–फुगेवाडी–कासारवाडी) येथून अनुसूचित जमाती (ST) महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी करणाऱ्या सौ. मथूरा सुनील भोईर यांच्या प्रचार मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
‘एक संधी… विकासासाठी, विश्वासासाठी!’ या घोषवाक्याखाली सुरू असलेला प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत आहे.
घराघरात जाऊन थेट संवाद यांमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महादेव कोळी समाजासह सर्व समाजघटक सौ. भोईर यांच्या सर्वसमावेशक विकास अजेंड्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.
आदिवासी अस्मितेचे जतन, स्वच्छता व सुरक्षितता, शिक्षणातील डिजिटल सुविधा, महिला सक्षमीकरण, क्रीडा सुविधा तसेच पर्यावरण संरक्षण हे प्रमुख मुद्दे नागरिकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहेत. दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडीतील गल्लीबोळ्यांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येत असून महिलांचे बचत गट व युवकांशी स्वतंत्र बैठकांचे आयोजन केले जात आहे. तरुणाईसाठी प्रस्तावित AI लर्निंग हब व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या घोषणांमुळे युवकांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे.
यावेळी सौ. मथूरा भोईर म्हणाल्या,
“नागरिकांनी दाखवलेला विश्वास हेच आमचे खरे बळ आहे. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकासाची किरण पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.”
प्रचार मोहीम अधिक तीव्र होत असून, प्रभाग ३० मध्ये परिवर्तनासाठी नागरिकांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे