माजी नगरसेवक सागर गवळी प्रचारात आघाडीवर
भोसरी प्रभाग ५ मध्ये इच्छुक उमेदवारांच्या गाठी भेटींना वेग माजी नगरसेवक सागर गवळी प्रचारात आघाडीवर

भोसरी प्रभाग क्रमांक ५ मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून गाडीभेटी, जनसंपर्क आणि प्रचार जोरात सुरू आहे. गल्लीबोळातून फिरत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे.
या प्रचाराच्या शर्यतीत माजी नगरसेवक सागर गवळी यांनी स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या प्रभागात पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचे समर्थक असलेले सागर गवळी यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यांच्या कार्यकाळात सचिन भैया लांडगे यांच्या साथीने त्यांनी केलेली विकासकामे आणि नागरिकांशी असलेला थेट संपर्क आजही त्यांना फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे.
सागर गवळी यांच्या प्रचाराला ‘दादा’ समर्थक राहुल गवळी, तुकाराम गवळी, पांडुरंग गवळी, किशोर गवळी यांच्यासह आळंदी रोड व्यापारी मंडळ, भाजी मंडईतील कार्यकर्ते आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.तसेच माजी नगरसेविका सुनीता गवळी जयश्री गवळी यांची साथ असून यावेळीही नगरसेवक पद गवळी कुटुंबातच राहावे, अशी भावना कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये व्यक्त होत असून त्यामुळे सागर गवळी यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर एकजूट दिसून येत आहे.
गाडीभेटीच्या माध्यमातून सागर गवळी हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत असून पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. “भोसरी प्रभागाचा विकास थांबू देणार नाही,” असा विश्वास ते नागरिकांना देत आहेत.
दरम्यान, प्रभाग ५ मध्ये इतर इच्छुक उमेदवारही मैदानात उतरले असले तरी सध्या तरी सागर गवळी यांना मिळणारा प्रतिसाद आणि संघटनात्मक ताकद लक्षवेधी ठरत आहे. येत्या काळात प्रचार अधिकच रंगणार असल्याचे चित्र आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
