Maharashtra

माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन; महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपले

माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन; महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपले

मुंबई, दि. २० डिसेंबर २०२५ :
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी मुंबईतील माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या.
डॉ. शालिनीताई पाटील या काँग्रेस पक्षातील प्रभावी व कर्तबगार नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता आणली.
. त्यांच्या स्पष्ट वक्तृत्वामुळे आणि निर्भीड भूमिकेमुळे त्या राज्यभर परिचित होत्या.

डॉ. शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली होती. त्या लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक-अध्यक्ष होत्या. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
इतिहास व साहित्याची आवड असलेल्या त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्या राजकारणापलीकडेही आदराने पाहिल्या जात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना “महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण” अशी उपमा दिली होती.

डॉ. शालिनीताई पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button