मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आशा वर्कर व सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
आशा वर्कर व सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
भोसरी प्रभाग क्र ५ येथे मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील आरोग्य व स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेऊन अहोरात्र सेवा करणाऱ्या आशा वर्कर व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन भोसरी प्रभाग क्र 5 नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या वतीने आदर्श शिक्षण संस्था संकुल येथे करण्यात आले होते. या वेळी आशा वर्कर व सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी पि ची पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
हा सत्कार समाजातील खऱ्या कोरोना योद्ध्यांप्रती आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रतिनिधी विजय अडसूळ


