किंगमेकर आमदार महेशदादा, शत प्रतिशत भाजप,विरोधकांची मोट बांधण्यात मोठे यश.
किंगमेकर आमदार महेशदादा, शत प्रतिशत भाजप,विरोधकांची मोट बांधण्यात मोठे यश.
📌 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 | भाजपा पिंपरी चिंचवड पक्ष प्रवेश
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘‘बलशाली भारत’’ आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पातील ‘‘विकसित महाराष्ट्र’’ घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मातब्बर मान्यवर लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये समाविष्ट होत आहेत.
भाजपा पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज शहरातील हॉटेल व्यावसाय क्षेत्रात आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख असलेले शेट्टी कुटुंबियांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेसोबत पुढे जाण्याची भूमिका घेतली. यावेळी माजी नगरसेवक श्री. माजी नगरसेवक श्री. प्रकाश बाबर, माजी नगरसेविका सौ. शारदा बाबर, श्री. अमित प्रकाश बाबर, सौ. एैश्वर्या बाबर यांचे पक्षात स्वागत केले.
तसेच, माजी नगरसेवक श्री. उल्हास शेट्टी, माजी नगरसेवक श्री. प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका सो. अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. देवीदास गोफणे, श्री. महेश गोफणे, महेश सहकारी बँकेचे श्री. अजय लढ्ढा, श्री. महेश काटे, श्री. संजय जगताप, श्री. लवकुश यादव, श्री. चेतन शेटे, श्री. गणेश कंकावणे, श्री. ऋिषी शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
