MaharashtraUncategorized
ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव यांचे निधन — महाराष्ट्र समाजकारणासाठी मोठा धक्का.
ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव यांचे निधन — महाराष्ट्र समाजकारणासाठी मोठा धक्का
पुणे, 8 डिसेंबर 2025: महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे अविभाज्य स्तंभ, कष्टकरी, हमाल, रिक्षा–माथाडी, बांधकाम मजूर व असंघटित कामगारांच्या हक्कासाठी संपूर्ण आयुष्य झटणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वय ९५ वर्षे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत अतोनात बदल झाला होता व त्यांनी आयसीयूमध्ये उपचार घेत होते. आज सायंकाळी ८.२५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

