जत तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश
जत तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश
जत येथील जनावर बाजार परिसरात घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटनेचा अवघ्या काही दिवसातच छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन सराईत आरोपींना अटक केलेली आहे.
मा.पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.घटनेची माहिती मिळताच ( स्था.गु.अ ) शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.कोणतेही ठोस भौतिक पुरावा उपलब्ध नसतानाही बातमीदार व स्थानिक श्रोतांकडून माहिती संकलित करून मयत विकास मलकरी टकले याची ओळख पठविण्यात आली.तपासादरम्यान गोपीनिय यंत्रणा सतर्क करण्यात आली.जत येथील यल्लमदेवीची यात्रा सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ असलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यातून रवींद्र बंडगर व विराज पांढरे हे दोन संशयित समोर आले.मिळालेल्या माहितीनुसार दोघे शिवाजी पेठ जत येथील तुराई प्लॉट परिसरात असलेचे समजताच पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
प्रथम चौकशीत दोघेही उडवाउडवीची उत्तरे देणारी व गोंधळलेले दिसून आले. कौशल्यपूर्ण तपासानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीनी सांगितले की,जत मार्केट यार्ड परिसरात आम्ही बसलो असता मयत विकास मलकरी टकले यांच्याशी ओळख झाली.तुम्हाला दारू पिण्यासाठी पैसे देतो असे सांगून आम्हा दोघांना दारू दुकानासमोर घेऊन गेला आणि दुकानाजवळ गेले नंतर पैसे नाहीत म्हणून सांगितले.रागाच्या भरात धडा शिकवू असे मनात ठरवून त्याला टू व्हीलर वरून जत येथील जनावर बाजार परिसरातील निर्जन्य परिसरात घेऊन येऊन लाकडी फळीने मारहाण करून त्याची कपडे काढून डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले.
परिस्थितीजन्य तांत्रिक पुराव्याच्या आधारे दोन्ही आरोपीनी खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपींना जत पोलिस ठाण्यातील संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे दोन्ही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी आर्म अक्ट गुन्हे दाखल आहेत.
प्रतिनिधी :- संजय कोळी.सांगली

