इरळी ग्रामपंचायत मधील तीन सदस्यांचे सदस्यत्व अपात्र
दिनांक :- १८/१२/२०२२५.
इरळी ग्रामपंचायत मधील तीन सदस्यांचे सदस्यत्व अपात्र
ग्रामपंचायतीचा कर न भरल्याचे कारणावरून इरळी ता.कवठेमहांकाळ जि. सांगली येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अपात्र झाल्याचा निर्णय मा.जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली यांनी दिला आहे.
यात माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन सदस्य आणि आमदार रोहित पाटील एका सदस्याचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की,माजी खासदार संजय पाटील पाटील समर्थक डॉ.बाळासाहेब पाटील गटाचे माजी उपसरपंच आबासाहेब खांडेकर व जगन्नाथ पाटील यांनी भगवान पुंडलिक पाटील,सिंधुताई प्रकाश माने व अश्विनी रमेश जाधव या तीन विद्यमान सदस्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना,ग्रामसेवकांनी वारंवार नोटिसा देऊनही दोन वर्षाचा ग्रामपंचायत कर न भरल्याने त्यांच्या वरती कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार अर्ज सादर केलेला होता.
सदर ग्रामसेवक यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी सांगली यांनी तीन डिसेंबर रोजी न्यायनिर्णय दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाने माजी मंत्री अजित घोरपडे व आमदार रोहित पाटील गटाला धक्का बसला आहे.
प्रतिनिधी :- संजय कोळी.सांगली

