इंडिगो एअरलाइन्सवर कर्मचारी आंदोलनाचा फटका; देशभर उड्डाणे ठप्प, प्रवाशांचा मोठा त्रास
इंडिगो एअरलाइन्सवर कर्मचारी आंदोलनाचा फटका; देशभर उड्डाणे ठप्प, प्रवाशांचा मोठा त्रास
मुंबई/नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२५ : देशातील सर्वात मोठी विमान सेवा असलेल्या इंडिगो एअरलाइन्सला कर्मचारी आंदोलनाचा मोठा फटका बसला असून २ आणि ३ डिसेंबर रोजी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादसह प्रमुख विमानतळांवर कॅबिन क्रूच्या कमतरतेमुळे उड्डाणे उशिरा किंवा रद्द झाली.
इंडिगोने यासाठी नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट (FDTL) नियम आणि तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे म्हटले असले तरी, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत इंडिगो कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चेक-इन काउंटरवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.
कॅबिन क्रू आणि व्यवस्थापनातील शिफ्ट वाद वाढल्याने अनेक फ्लाइट्स रद्द किंवा उशिरा सुटल्या.
नोव्हेंबरमध्येच इंडिगोने १,२३२ उड्डाणे रद्द केली होती, त्यातील ७५५ उड्डाणे स्टाफ समस्यांमुळे होती. याबाबत DGCA ने चौकशी सुरू केली आहे. ४ डिसेंबर सकाळपासून परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असली तरी इंडिगोने प्रवाशांना अॅप किंवा वेबसाइटवर लाइव्ह फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला दिला आहे.
देशातील विमान प्रवास क्षेत्रातील ही मोठी गोंधळाची घटना असून, सरकारकडून हस्तक्षेपाची मागणीही वाढू लागली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

