Uncategorized
हिंजवडी आयटी पार्कमध्ये भीषण अपघात; दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, सहा जखमी.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात 1/12/2025 रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस अचानक बेकाबू झाली आणि थेट फूटपाथवर चढली. त्यावेळी शाळेत जाण्यासाठी निघालेला एका मुलासह एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून बसचालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ पुणे.