हिंदू महासभेकडून सौ. तृप्ती मनोज तारे यांची प्रभाग २५ (क) मधून अधिकृत उमेदवारी जाहीर

हिंदू महासभेकडून सौ. तृप्ती मनोज तारे यांची प्रभाग २५ (क) मधून अधिकृत उमेदवारी जाहीर
पुणे | प्रतिनिधी
अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (क) मधून सौ. तृप्ती मनोज तारे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. “आम्ही आलोय!” या ठाम घोषणेसह हिंदू महासभा निवडणूक रिंगणात उतरली आहे.
सौ. तारे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून विविध सामाजिक, नागरी व जनहिताच्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची त्यांची भूमिका परिसरात परिचित आहे.
नुसत्या आश्वासनांपेक्षा निश्चय, कृती आणि प्रलोभनांच्या जाळ्यातून नागरिकांची मुक्तता हा हिंदू महासभेचा मुख्य अजेंडा असून, त्याच पार्श्वभूमीवर सौ. तारे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग समस्या,पारदर्शक प्रशासन तसेच सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे सौ. तारे यांनी सांगितले.
उमेदवारी जाहीर होताच प्रभाग २५ (क) मधील कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

