हिंदू महासभेचा ‘हिंदू महासभा – मित्र मेळावा’ २१ डिसेंबरला पुण्यात
हिंदू महासभेचा ‘हिंदू महासभा – मित्र मेळावा’ २१ डिसेंबरला पुण्यात

पुणे | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
हिंदू महासभेच्या वतीने “हिंदू महासभा – मित्र मेळावा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गणेश मंगल कार्यालय भाऊ महाराज बोळ, तुळशीबागेजवळ, शुक्रवार पेठ, पुणे २ ,येथे होणार आहे.
या मित्र मेळाव्यात कट्टर हिंदुत्व, अर्थकारण, उद्योग, समाजकारण तसेच विकास प्रक्रियेत हिंदू समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज, त्यांची भूमिका व उपलब्ध संधी यावर सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे. यासोबतच हिंदूंना योग्य आर्थिक आरक्षण, त्यासाठी आवश्यक राजकीय समन्वय आणि संघटनबांधणी यावरही चर्चा होणार आहे.
यापूर्वी पुण्यनगरीला महापौर देणारा आणि ११० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला हिंदू महासभा हा पक्ष आहे. हिंदुस्थानातील हिंदूंच्या हितरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या पक्षाची वैचारिक आणि संघटनात्मक परंपरा आजही तितकीच भक्कम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर पुण्यात होणारा हा मित्र मेळावा हिंदू समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच हिंदू समाजाशी बांधिलकी जपणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हिंदू महासभेच्या वतीने सर्व नागरिकांना कुटुंबीय व मित्रपरिवारासह या मित्र मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
