एका पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करून गुणवत्तेनुसार निवड; ठाणे पोलीस दलातील 11 चालक पोलीस शिपायांची सेवा समाप्त
एका पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करून गुणवत्तेनुसार निवड; ठाणे पोलीस दलातील 11 चालक पोलीस शिपायांची सेवा समाप्त
ठाणे, दि. 15 डिसेंबर 2025 :
सन 2019 चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान एका पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज सादर करून गुणवत्तेनुसार निवड झालेल्या 11 चालक पोलीस शिपायांची सेवा माननीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार समाप्त करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश पोलीस आयुक्तालय, ठाणे यांनी जारी केला आहे.
विशेष याचिका क्रमांक 11353/2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांनी एकाच भरती प्रक्रियेत एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज सादर करून निवड मिळवल्याचे निदर्शनास आले. ही बाब भरती नियमांच्या विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार संबंधित चालक पोलीस शिपायांची सेवा दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून समाप्त करण्यात येत असून, ते सर्व कर्मचारी ठाणे मोटार परिवहन विभाग (Mo.P.V., Thane) येथे कार्यरत होते.
सेवा समाप्त करण्यात आलेल्या चालक पोलीस शिपायांची नावे :
1. चापोशी/4488 महेश परमेश्वर टकले
2. चापोशी/6198 शैलेंद्र अनिल पेंडारे
3. चापोशी/709 अमोल विठ्ठल खांडेकर
4. चापोशी/6210 नितीन पांडुरंग शेजवळ
5. चापोशी/6207 शिवाजी पंढरी पवार
6. चापोशी/6194 किरण शेपराव नरोडे
7. चापोशी/6264 संदीप दिलीप शिंदे
8. चापोशी/6261 बालाजी सिद्राम शिंदे
9. चापोशी/6180 पंकज भाऊ फणसे
10. चापोशी/6223 पूजा मनोज अडसुळे
11. चापोशी/6152 रेश्मा चांद शेख
आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय साहित्य, ओळखपत्रे व इतर कागदपत्रे तात्काळ जमा करावीत तसेच वेतन व सेवा समाप्तीशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे यांनी जारी केला असून, सर्व संबंधित विभागांनी त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


