दिघी माऊली नगर, साई पार्क लेन १ येथे ड्रेनेज जॅमचा प्रश्न निकाली

दिघी माऊली नगर, साई पार्क लेन १ येथे ड्रेनेज जॅमचा प्रश्न निकाली
दिघी येथील माऊली नगर परिसरातील साई पार्क लेन १ मध्ये ड्रेनेज लाईन जॅम झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय डोळस यांनी सातत्याने पाठपुरावा करत नागरिकांची समस्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास फोनद्वारे आणून दिली.
तत्काळ पालिकेने सकारात्मक भूमिका घेत जेट एअर वाहन उपलब्ध करून दिले. साई पार्क येथील ड्रेनेज लाईनमधील जॅम काढण्यात आला. लाईनमध्ये अडकलेले दगड, मैला व घाण प्रेशर जेट मशीनच्या सहाय्याने पूर्णतः साफ करण्यात आली, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी समस्या उद्भवू नये.
या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून सर्व रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय डोळस तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे आभार मानले आहेत.
प्रतिनिधी विजय अडसूळ


