Maharashtra

चला प्रचाराला, लोकाभिमुख राजकारणाला” या संदेशासह भाजपाचे रवी लांडगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

चला प्रचाराला, लोकाभिमुख राजकारणाला” या संदेशासह भाजपाचे रवी लांडगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रवी लांडगे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी सकाळी ९ वाजता सिद्धेश्वर मंदिर, धावडेवस्ती येथून होणार आहे. “चला प्रचाराला, लोकाभिमुख राजकारणाला” हा संदेश देत या प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे.
या प्रचारादरम्यान रवी लांडगे हे भोसरीतील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरासह भोसरी परिसरातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये देवदर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेणार आहेत.
लोकाभिमुख विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे राजकारण हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून प्रचाराची सुरुवात उत्साहात होणार असल्याचे चित्र आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button