बाळासाहेब पवार स्मृती करडंक जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा : अनुपम क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट अकॅडमीची विजयी सलामी
बाळासाहेब पवार स्मृती करडंक जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा : अनुपम क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट अकॅडमीची विजयी सलामी

नेवासा प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करडंक जिल्हा स्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या 16 वर्ष वयोगटातील सामन्यांना आज उत्साहात सुरुवात झाली.
पहिला सामना : अनुपम क्रिकेट अकॅडमीचा 12 धावांनी विजय
पहिल्या सामन्यात अनुपम क्रिकेट अकॅडमी विरुद्ध साईदिप क्रिकेट अकॅडमी आमनेसामने आले.
अनुपमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि निर्धारित 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या.
संघाकडून सौरभ हिरवाळे 28 आणि सार्थक शिंदे 24 धावा करून चमकले.
साईदिपकडून गोलंदाजीत रितेशने 4 बळी, तर ओम पवार आणि श्रीदिप अढागळे यांनी प्रत्येकी 2 बळी घेत चांगली कामगिरी केली.
प्रत्युत्तरात साईदिप क्रिकेट अकॅडमीने प्रत्ययकारी खेळ केला मात्र 20 षटकात 9 बाद 130 धावाच करू शकला. त्यांच्याकडून श्रीदिप अढागळे 48 धावांनी सर्वाधिक योगदान दिले.
अनुपम क्रिकेट अकॅडमीकडून दिप गुंदेचा याने जबरदस्त गोलंदाजी करत 5 बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
त्याची सामनावीर म्हणून निवड झाली असून पुरस्काराचे वितरण ॲडव्होकेट संभाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दुसरा सामना : समर्थ क्रिकेट अकॅडमीचा 10 गडी राखून दणदणीत विजय
दिवसाचा दुसरा सामना आर.एल क्रिकेट अकॅडमी विरुद्ध समर्थ क्रिकेट अकॅडमी यांच्यात रंगला.
समर्थने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरला.
आर.एल क्रिकेट अकॅडमीचा डाव 18.1 षटकात 67 धावांत आटोपला.
आर.एल कडून आर्यन सातपुतेने 25 धावा केल्या.
समर्थच्या गोलंदाजीत
मोहसीन सय्यद – 3 बळी
सुमेध येनगुल, ओम देवळालीकर, आदित्य गोरे – प्रत्येकी 2 बळी
अशी उत्कृष्ट कामगिरी दिसून आली.
68 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना समर्थ क्रिकेट अकॅडमीने 7 षटकांत कोणताही गडी न गमावता विजय मिळवला.
मोहित चव्हाण नाबाद 34 व रुद्र पवार नाबाद 24 यांनी दमदार खेळी करत सहज विजय मिळवला.
मोहसीन सय्यद याची सामनावीर म्हणून निवड झाली.
पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर अजय कविटकर यांच्या हस्ते करण्यात आले.