1. जत नगरपंचायत मतदानात 73.4 टक्के मतदानाची नोंद
जत नगरपंचायत मतदानात 73.4 टक्के मतदानाची नोंद
जत : ०२ डिसेंबर २०२५
जत नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी लोकशाहीचा उत्सव जल्लोषात साजरा करत 73.4 टक्के मतदान नोंदविले. शहरातील एकूण 28,090 मतदारांपैकी 20,519 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये महिला उमेदवार आणि महिला पोलिसांमध्ये किरकोळ वादावादीची घटना झाली असली तरी मतदान प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली.
दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी डॉ. रवींद्र आरळी, सुजराव उर्फ नाना शिंदे, सुरेशराव शिंदे (सरकार) आणि सलीम गवंडी यांच्यात चुरस पाहावयास मिळाली. चौरंगी लढतीमुळे निकालाबाबत मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी – संजय कोळी ,सांगली.



