TET प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार उघडकीस; कोल्हापूरमध्ये ९ जणांना अटक
TET प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार उघडकीस; कोल्हापूरमध्ये ९ जणांना अटक
कोल्हापूर, २३ नोव्हेंबर — राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरू असताना प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ९ जणांच्या टोळीला अटक केली असून, हे आरोपी ग्रामपरीक्षा केंद्रावर पेपर लीक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
अटकेत असलेल्या काही आरोपींचा परीक्षा शाळेतील कर्मचारी वर्गाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत.
या प्रकारानंतर राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया आणि परीक्षेची पारदर्शकता यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण विभाग आणि परीक्षा प्राधिकरणाने याप्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.
घटनानंतर परीक्षार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून राज्यभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे