समस्त ब्राह्मण संघाची शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याशी भेट; समाजाच्या अपेक्षा मांडत संतुलित प्रतिनिधित्वाची मागणी
समस्त ब्राह्मण संघाची शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याशी भेट; समाजाच्या अपेक्षा मांडत संतुलित प्रतिनिधित्वाची मागणी

पुणे : समस्त ब्राह्मण संघाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांची सदिच्छा भेट घेऊन ब्राह्मण समाजाची भूमिका आणि अपेक्षा त्यांच्या समोर मांडल्या. विविध संस्थांचे १२ ते १५ प्रतिनिधी या भेटीस उपस्थित होते.
बैठकीत समाजाच्या संतुलित प्रतिनिधित्वाचा मुद्दा विशेषत्वाने मांडण्यात आला. ब्राह्मण समाज बौद्धिक परंपरा, सामाजिक समरसता आणि हिंदुत्ववादी मूल्ये जपत असल्याने समाजातील योग्य आणि पात्र व्यक्तींना राजकीय व संघटनात्मक संधी मिळाव्यात, अशी मागणी प्रतिनिधींनी केली.
यावेळी अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सातत्याने कार्यरत असलेल्या श्री महेश कुलकर्णी यांच्या योगदानाचा विचार करावा, अशी विशेष विनंतीही ब्राह्मण संघाच्या वतीने करण्यात आली.
या चर्चेवर प्रतिक्रिया देताना श्री शत्रुघ्न काटे यांनी आश्वासक भूमिका व्यक्त करत सांगितले की,
“पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व समाजांनी एकदिलाने उभे राहावे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या १२८ उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित शक्ती लावावी.”
हिंदुत्वाचा मूलाधार जपत समाजाने एकसंघपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिष्टमंडळाने श्री काटे यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. समस्त ब्राह्मण संघ श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

