Maharashtra
रविवार पेठेत अनधिकृत फलकाचा वाद; हिंदू महासभेचे पोलिसांना निवेदन
रविवार पेठेत अनधिकृत फलकाचा वाद; हिंदू महासभेचे पोलिसांना निवेदन

पुणे ; रविवार पेठेत स्थानिक रहिवाशांनी गेल्या २० वर्षांपासून ‘फलक–बॅनर निषिद्ध क्षेत्र’ म्हणून ठरवलेल्या ठिकाणी ‘अजमेरी १५०० बॉईज’ नावाचा अनधिकृत फलक लावण्यात आला आहे. अनेक महिने स्थानिकांनी तक्रारी करूनही हा फलक काढण्यात आलेला नसल्यामुळे परिसरात नाराजी पसरली आहे.
यासंदर्भात आज हिंदू महासभेने खडक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन या अनधिकृत फलकाची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली.
महासभेने स्पष्ट भूमिका घेतली की—
“सदर अनधिकृत फलक ८ दिवसांच्या आत काढण्यात आला नाही, तर त्याच ठिकाणी हिंदू महासभेचे फलक लावले जातील.”
या निवेदनावेळी स्थानिक रहिवासी तसेच हिंदू महासभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

