राजेश दामधर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

राजेश दामधर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
पारध प्रतिनिधी श्री महेंद्र बेराड सर
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु येथील रहिवाशी असलेले राजकीय , सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीमान राजेश दौलतराव दामधर यांची नागपुर येथील शासन मान्य मदत सामाजिक संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी नुकतीच निवड केली आहे . हा पुरस्कार नागपुर येथे दि. 16 / 1 1 / 2025 रोज रविवारला देण्यात येणार आहे मदत सामाजिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संम्मेलन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे या संम्मेलनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे श्री राजेश दामधर उच्चशिक्षित असून त्यांनी अनेक प्रशिक्षण घेतलेले आहे बालपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी तालूका स्तरावर , जिल्हास्तरावर , गावपातळी वर अनेक राजकिय आणि सामाजिक पदे भुषविले आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून ते पत्रकार आहेत त्यांच्या परिसरात झुंजार पत्रकार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलेली आहेत आणि पत्रकार संघटनेचे ते तालूका पदाधिकारी राहीलेले असून ते सध्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष आहेत . त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन सर्वसामान्य माणसाच्या समस्या , शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा लिखाण केलेले आहे त्यांनी त्यांच्या आर्टिकल मधून , कवितेमधून , बातमी मधून भावना व्यक्त केल्या आहेत त्यांचा राजकीय , सामाजिक आणि पत्रकारीतेचा प्रवास हा संघर्षमय , खडतर झालेला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मदत या शासनमान्य संस्थेने घेतली असल्याने या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे . राजेश दामधर हे अत्यंत गरिब परिस्थिती तुन शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले असून त्यांना सर्वसामान्य माणसाच्या दुःखाची , वेदनेची , समस्येची , अडचणीची , अज्ञानाची, अंधश्रद्धेची चांगलीच जाणीव आहे त्यामुळे ते भरपूर क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्य करू शकले यात तिळमात्र शंका नाही राजेश दामधर हे हा पुरस्कार स्वीकारण्या साठी नागपुर येथे जाणार असल्याचे बोलले जात आहे या पुरस्काराचे स्वरूप हे सन्मान चिन्ह , दुपट्टा , मानपत्र , पुष्पगुच्छ आणि भारताचे संविधान असे असणार आहे राजेश दामधर यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे भारज आणि परिसरामध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
