प्रभाग 24 थेरगावातून उदय कुलकर्णी इच्छुक

प्रभाग 24 थेरगावातून उदय कुलकर्णी इच्छुक
चिंचवड,थेरगाव :प्रभाग क्रमांक 24 थेरगाव येथून उदय कुलकर्णी यांनी आगामी निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून घोषणा केली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पश्चिम महाराष्ट्र उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून उद्योग क्षेत्राबरोबर सामाजिक प्रश्नांवरही सक्रिय भूमिका बजावत आहेत. गेल्या 35 वर्षापासून ते या प्रभागात वास्तव्यास आहेत
थेरगावातील दररोज वाढणारी वाहतूक कोंडी, कचरा संकलनातील अव्यवस्था, तसेच पाणीपुरवठा, रस्ते-विकास आणि सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, वेळेवर कचरा गाडी न येणे, सार्वजनिक ठिकाणी घाण साचणे आणि नागरिकांच्या अडचणी यावर शिस्तबद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
थेरगावच्या अनेक भागांत सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी, अनियमित पार्किंग आणि रस्त्यांची दयनीय अवस्था ही तात्काळ सोडवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नागरिक व सामाजिक संघटनांकडून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता ते प्रचाराची आखणी करत आहेत
थेरगावमधील वाढती वाहतूक कोंडी, अनियमित पार्किंग, अरुंद रस्ते आणि कचरा व्यवस्थापनातील गंभीर अडचणी या विषयांना प्राधान्य देत प्रभावी उपाययोजना राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे. रस्ते-विकास, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, महिलांची सुरक्षा, युवकांसाठी रोजगारसंधी आणि स्वच्छता मोहिम या मुद्द्यांवरही ते काम करणार आहेत.
थेरगावचा बदल घडवण्याची वेळ आली आहे!
प्रभाग 24 — उदय कुलकर्णी (इच्छुक)
🔵 उपाध्यक्ष — पश्चिम महाराष्ट्र उद्योग आघाडी
(राष्ट्रवादी काँग्रेस — अजित पवार गट)
थेरगावातील सर्वात मोठे दोन प्रश्न:
🚧 वाहतूक कोंडी
🗑️ कचरा व्यवस्थापनातील अव्यवस्था
हे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मी — उदय कुलकर्णी, प्रभाग 24 मधून इच्छुक उमेदवार म्हणून उभा आहे.
माझे प्राथमिक मुद्दे:
✔ वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध रस्ताविकास
✔ अनियमित पार्किंगवर नियंत्रण
✔ कचरा व्यवस्थापनात आधुनिक प्रणालीची अंमलबजावणी
✔ स्वच्छ व सुरक्षित थेरगाव
✔ पाणीपुरवठा व ड्रेनेज सुधारणा
✔ युवकांसाठी संधी आणि महिलांसाठी सुरक्षा
थेरगाव बदलणार… तुमचा पाठिंबा मिळाल तर नक्की बदलणार!
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

