Uncategorized

पिंपरी चिंचवडमध्ये घर कामगार- कष्टकरी महिलांचा होणार सन्मान..!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त यंदा एक विशेष समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून शहरभरातून या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे. शहरातील सुमारे ५ हजार कष्टकरी महिला आणि घरकामगार माता-भगिनींची नोंदणी करून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, समाजातील दुर्लक्षित महिलांना प्रोत्साहन देणारी ही अनोखी संकल्पना आहे.

उपक्रमाचे समन्वयक अमोल बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांचा विशेष सत्कार करून त्यांच्या दैनंदिन कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. शहरातील स्वच्छता, कुटुंब व्यवस्थापन आणि समाजासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या या महिलांच्या संघर्षाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम समर्पित करण्यात आला आहे.

महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा १०० हून अधिक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, यात रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध समाजोपयोगी प्रकल्पांचा समावेश आहे. शहरातील अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यात उत्साहाने सहभागी होत आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण देत आमदार लांडगे यांनी वाढदिवसासारख्या उत्सवी क्षणाद्वारे समाजातील कष्टकरी घटकांना मान्यता देण्याचा आदर्श ठेवला आहे. या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक सलोखा, कृतज्ञता आणि संवेदनशीलतेचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

प्रतिनिधी:शाम शिरसाठ पुणे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button