Uncategorized

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य रोजगार मेळावा; विविध क्षेत्रात नोकरीच्या मौल्यवान संधी

पिंपरी-चिंचवडमध्ये  भव्य रोजगार मेळावा; विविध क्षेत्रात नोकरीच्या मौल्यवान संधी.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या 28 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नोकरी शोधणाऱ्या युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. हा रोजगार मेळावा समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, लाइटहाउस कम्युनिटीज, GOYN आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

🕘 वेळ व तारीख

तारीख: 28 नोव्हेंबर 2025

वेळ: सकाळी 10 ते सायं. 5

🎯 पदांची संधी

रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांमध्ये खालील पदांसाठी भरती होणार आहे:

बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह

टेलिकॉलर

सेल्स एक्झिक्युटिव्ह

IT इंटर्न

सिक्युरिटी गार्ड

फ्लोअर एक्झिक्युटिव्ह

BPO / KPO

बँक रिलेशनशिप ऑफिसर

शैक्षणिक पात्रतेनुसार अनेक कंपन्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार असल्याने उमेदवारांना त्याच दिवशी निवड होण्याचीही शक्यता आहे.

📄 आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह उपस्थित राहावे:

आधार कार्ड, पॅन कार्ड ,मार्कशीट ,चार झेरॉक्स प्रती

दोन पासपोर्ट साईज फोटो

📍 ठिकाण: ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर,

एच ब्लॉक, एमआयडीसी, चिंचवड ईस्ट, पुणे – 411019

☎️ संपर्क व नोंदणी

केतन शिंदे: 8830116446

काकासाहेब भुरे: 9860138490

पिंपरी-चिंचवडमधील युवकांसाठी हा रोजगार मेळावा रोजगाराच्या नव्या संधींचे दार उघडणारा ठरणार आहे. रिज्युमे घेऊन वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिनिधी:शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button