Maharashtra
नवले ब्रिजवरील वेगमर्यादा कमी; वाहतूक सुरक्षेसाठी प्रशासनाचे कडक उपाय
📰 नवले ब्रिजवरील वेगमर्यादा कमी; वाहतूक सुरक्षेसाठी प्रशासनाचे कडक उपाय
पुणे :
नवले ब्रिज परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील नवले ब्रिजवर वाहनांच्या वेगमर्यादेत तात्काळ बदल करण्यात आला असून 60 किमी/तासवरून वेगमर्यादा 30 किमी/तास इतकी कमी करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी ब्रिजवरील कॅमेरा सर्व्हिलन्स अधिक मजबूत करण्यात आला असून, वेगमर्यादा ओलांडल्यास थेट 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.अलीकडेच घडलेल्या भीषण अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ताl
सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे
पुणे जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या आदेशानुसार हे नियम त्वरित प्रभावी झाले आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे



