नेवासा नगरपंचायत निवडणूक : डॉ. करणसिंह घुले यांची जोरदार फिल्डिंग, प्रचारात आघाडी.

नेवासा प्रतिनिधी│ आगामी नेवासा नगरपंचायत निवडणुकीची धामधूम वाढत असताना, विविध पक्षांचे उमेदवार आणि संभाव्य उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यात डॉ. करणसिंह घुले यांनी आपल्या दमदार फिल्डिंगसह आणि नियोजनबद्ध प्रचाराच्या जोरावर सध्या स्पष्ट आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
स्थानिक पातळीवर डॉ. घुले यांनी घर-घर संपर्क, युवा वर्गाशी संवाद, महिलांसाठी विशेष उपक्रम, तसेच नगरातील मूलभूत सुविधांवरील मुद्द्यांवर सातत्याने उपस्थिती दाखवत आपली मजबूत छाप उमटवली आहे. विशेषतः आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्थानिक विकास यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मांडलेल्या भूमिकेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारादरम्यान डॉ. घुले यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिसून येत असून, तरुण कार्यकर्त्यांनी रचलेल्या सोशल मीडिया मोहीमेनेही त्यांच्या लोकप्रियतेत भर घातली आहे. गावातील गणमान्य व्यक्ती, सामाजिक संघटना तसेच महिलांचा सहभाग त्यांच्या प्रचाराला अधिक बळकटी देत आहे.
दरम्यान, इतर उमेदवारांनीही आपापल्यापरीने प्रचार रणनीती आखल्याचे दिसत असले तरी डॉ. घुले यांची सातत्य, लोकांशी साधलेला थेट संवाद आणि संघटनेची मजबूत पकड यांमुळे ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आगामी काही दिवसांत प्रचार अधिक तापेल आणि त्यात कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अस्मिता मिडीया ,नेवासा प्रतिनिधी