नाशिक तपोवन वृक्षतोडप्रकरणी सयाजी शिंदेंचा थेट इशारा
नाशिक तपोवन वृक्षतोडप्रकरणी सयाजी शिंदेंचा थेट इशारा
नाशिकमधील तपोवन परिसरात आगामी 2026-27 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याच्या तयारीत 1800 हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी झाडे आमचे आईबाप असून ती तोडू देणार नाही असे स्पष्ट सांगितले.
तपोवन परिसरातील झाडांची नुकतीच नाशिक महापालिकेमार्फत पाहणी करण्यात आली. जुनी आणि मागील दहा वर्षांत उगवलेल्या झाडांची मोजणी करून साधूग्रामसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आवश्यक असल्याचे संकेत देण्यात आले. यानंतर पर्यावरणप्रेमींनी चिपको आंदोलनाच्या धर्तीवर आक्रमक आंदोलन सुरू केले.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनाची पाहणी करून एक झाड तोडून दहा लावू असे आश्वासन दिले. मात्र सयाजी शिंदे यांनी हे आश्वासन दुर्लक्षित करत ते दुर्दैवी असल्याचे म्हटले. त्यांनी एक झाड तोडले तर शंभर जण मरायलादेखील तयार होतील असा कठोर इशारा दिला.
शिंदे यांनी वृक्षतोड तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. साधूग्रामसाठी पर्यायी जागा शोधावी आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींना विश्वासात घ्यावे असे त्यांनी स्पष्ट केले. निसर्गाचा समतोल बिघडवून कुंभमेळ्याच्या तयारीचे औचित्य साधता कामा नये असेही त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429