नाशिक – तपोवन झाडतोडीविरोधात हिंदू महासभेचे आज आंदोलन

नाशिक – तपोवन झाडतोडीविरोधात हिंदू महासभेचे आज आंदोलन
तपोवन परिसरातील प्रस्तावित झाडतोडीविरोधात अखिल भारत हिंदू महासभेतर्फे आज, रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता, पंचवटीतील तपोवन श्रीराम पुतळ्याच्या मागे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.
“झाडे तोडून कुंभचे नाव बदनाम करू नका… झाडे वाचवा – जीवन वाचवा” असा संदेश देत हिंदू महासभेचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनात सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात हिंदू महासभेचे ऍडव्होकेट पंकज चौहान, होरा भूषण गोसावी यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे.
रिपोर्टर : उमेश कुलकर्णी, पुणे
मो. 9822548429

