Maharashtra
मुंबईतील CNG पुरवठा ठप्प; वाहतूक व्यवस्थेत गोंधळ
मुंबईतील CNG पुरवठा ठप्प; वाहतूक व्यवस्थेत गोंधळ
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे CNG पुरवठा अचानक बंद झाला आहे. त्यामुळे शहरातील शेकडो CNG पंप बंद पडले असून ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि बससेवांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पंपांवर लांबच लांब रांगा दिसत आहेत. MGL आणि GAIL यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे सांगितले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


