मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर अनधिकृत अनावरण प्रकरणी गुन्हा दाखल
मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर अनधिकृत अनावरण प्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबई – मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर नवी मुंबई पोलिसांनी परवानगीशिवाय पुतळा अनावरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे गेल्या चार महिन्यांपासून अनावरण झाले नव्हते. पुतळा कपड्याने झाकून ठेवल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
आज मनसे नेते अमित ठाकरे स्वतः पुतळ्याजवळ दाखल झाले आणि सुमारे 70 मनसे कार्यकर्त्यांसह पुतळ्याचे अनधिकृत अनावरण केले. पोलिसांची उपस्थिती असतानाही कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता अनावरण करण्यात आल्याने याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापटही झाली.
या घटनेनंतर पोलिसांनी परवानगीशिवाय सार्वजनिक मालमत्तेवर हस्तक्षेप, जमावबंदीचे उल्लंघन आणि सरकारी कामात अडथळा या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.
अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“हा माझ्या आयुष्यातील पहिला राजकीय गुन्हा आहे. महाराजांसाठी असे कितीही गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. हे प्रकरण राजकीय आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आमची भावना कुणी थांबवू शकत नाही,” असे ते म्हणाले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
